Mumbai Rains: मुंबईत सहा तासात 300 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत

रेल्वे सेवा थांबली आहे. सकाळी 1 ते सकाळी 7 या सहा तासांत विविध ठिकाणी 300 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

Mumbai Rains: मुंबईत गेल्या सहा तासात धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे(Mumbai Rains) सर्वकाही ठप्प झाले आहेत. रेल्वे सेवा थांबली आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले (waterlogging) आहे. वाहने पाण्यात बंद पडत आहेत. सकाळी 1 ते सकाळी 7 या सहा तासांत विविध ठिकाणी 300 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. काही सखल भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे. उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अजूनही मुसळधार पावसाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी, महानगरपालिकेने खाजगी शाळा आणि महाविद्यालयांना पहिल्या सत्राची सुट्टी जाहीर केली आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर केला जाईल असे बीएमसीने म्हटले आहे.

पोस्ट पहा