Mumbai Rains Update: मुंबई मध्ये आज तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये अधून मधून जोरदार सरी बरसण्याचा अंदाज आहे.

Mumbai Rains | X

मुंबई मध्ये आज सकाळी अनेक ठिकाणी पाऊस बरसला असल्याने वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये अधून मधून जोरदार सरी बरसण्याचा अंदाज आहे. सध्या वातावरणामध्ये गारवा असल्याने लोकांची उन्हाच्या कडाक्यापासून सुटका झाल्याने दिलासा मिळालेला आहे. दरम्यान आज समुद्राला भरती- सकाळी - १०:२५ वाजता असेल जेव्हा लाटांची उंची ३.९२ मीटर असण्याचा अंंदाज आहे. ओहोटी - दुपारी - ०४:१७ वाजता आहे जेव्हा लाटांची उंची  २.२५ मीटर उसळण्याचा अंदाज आहे. तर पुन्हा रात्री रात्री - १०:०५ वाजता असलेल्या भरती मध्ये  ३.४५ मीटर लाटा उसळू शकतात आणि 20 जूनच्या  पहाटे ०४:११ वाजता ओहोटी असून लाटा ०.८२ मीटर आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement