Mumbai Rains: मुंबईत पावसाचा जोर वाढला; खांदेश्वर रेल्वे स्थानकात शिरले पाणी (Watch Video)

मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाने हजेरी लावली.

Mumbai Rains (संग्रहित संपादित प्रतिमा)

नुकताच हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, बीड, लातूर, जालना, परभणी आणि महाराष्ट्रातील इतर अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरु आहे, मात्र आज पावसाने चांगलाच कहर केला. मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नवी मुंबईच्या खांदेश्वर रेल्वे स्थानकामध्ये पाणी साचले आहे. खांदेश्वर रेल्वे स्थानकात पाणी शिरल्याने आता हे पाणी बाहेर काढण्यासाठी थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे तसेच पावसाचा जोरही कायम असल्याचं पहायला मिळत आहे. रेल्वे स्थानकात शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी तेथे पंपही लावण्यात आले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)