Mumbai Rain Update: मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 3 ते 4 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; लोकांना आवश्यकतेशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला

अशात मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Rain | Pixabay.com

Mumbai Rain Update: रविवारपासून (7 जुलै) मुंबईसह उपनगरात वापसाचा जोर वाढला आहे. आज दिवसभर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने यापूर्वीच अलर्ट जारी केला होता, आता ताज्या निरीक्षणानुसार, मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 3 ते 4 तासांत पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईसह रत्नागिरी, रायगड परिसरात पुढील तीन तास मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून हा पावसाचा इशारा देण्यात आला असून, लोकांना आवश्यकतेशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एकीकडे मुंबईत पावसाचा रेड अलर्ट आहे, तर दुसरीकडे शहरालगतच्या समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. अशात मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रविवारी रात्री मुंबईत सहा तासांत 300 मिमी पाऊस झाला. हा मुंबईतील वार्षिक पावसाच्या 10% आहे. या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, सातारा, कोल्हापूर, नाशिक येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (हेही वाचा: Red Alert For Ratnagiri And Sindhudurg: रत्नागिरी-सिंधुदुर्गात अतिवृष्टीचा इशारा, मुंबईसह ठाणे रायगडसाठीही ऑरेंज अलर्ट)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)