Mumbai-Pune Expressway Special Block Today: आज मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दोन तासांचा ब्लॉक, पाहा तपसील

आज मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mumbai Pune Express Highway

Mumbai-Pune Expressway Special Block Today: आज मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. याम संदर्भात एमएसआरडीसीकडून माहिती देण्यात आली आहे. मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर हायवे ट्रॅफिक मॅनेटमेंट सिस्टीमअंतर्गत गॅंट्री उभारण्याचं काम एमएसआरडीसीकडून केलं जाणार आहे. त्यामुळे हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी 2 वाजल्यानंतर पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरळीत होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर 21 नोव्हेंबर दोन तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून माहिती देण्यात आली आहे. मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर 35/500 किमी अंतरावर हायवे ट्राफिक मॅनेटमेंट सिस्टीमअंतर्ग गॅंट्री उभारण्याचं काम एमएसआरडीसीकडून केलं जाणार आहे.

मुंबई पुणे दृतगती मार्गावरील पुणेकडे जाणाऱ्या वाहिनीवरून जाणारी हलकी वाहने शेडुंग फाटा येथून वळवून NH 4 जुना मुंबई पुणे मार्गावरून शिंग्रोबा घाटातून मेजिक पॉइंट येथून पुन्हा दृतगती मार्गावर पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement