Mumbai Prohibitory Orders: मुंबईमध्ये 30 दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी; ड्रोन, पॅराग्लायडिंग इ. वर 18 जानेवारीपर्यंत बंदी
मानवी जीवन, मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी, सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून यांनी पोलीस उप आयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी बृहन्मुंबई यांच्याद्वारे बृहन्मुंबई शहर हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.
Mumbai Prohibitory Orders: बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी 20 डिसेंबर 2023 ते 18 जानेवारी 2024 दरम्यान शहरात कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. मानवी जीवन, मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी, सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून यांनी पोलीस उप आयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी बृहन्मुंबई यांच्याद्वारे बृहन्मुंबई शहर हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. या काळात राष्ट्रीय हिताला बाधा पोहचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील असे घटक जसे एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, ड्रोन, पॅरा मोटर्स, हँण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलून इ. च्या उड्डाण क्रियांना बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात बंदी घालण्यात आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)