Mumbai Pothole Menace: तक्रार केल्यानंतर 24 तासांत बुजवले जाणार मुंबईमधील खड्डे; BMC चे आश्वासन
एखाद्या खड्ड्याबाबत तक्रार आल्यास, उपअभियंत्यांना घटनास्थळी भेट देऊन कंत्राटदाराने 24 तासांच्या आता मॅस्टिक डांबराने खराब पॅच भरला आहे की नाही, याची खात्री करावी लागेल.
Mumbai Pothole Menace: महाराष्ट्रात मान्सूनला सुरुवात झाली आहे. मुंबई-पुण्यासह राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशात खराब रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईत पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे बीएमसी नेहमीच अडचणीत येत असते. आता यंदा या समस्येचा सामना करण्यासाठी नागरी संस्थेने 227 वॉर्डांसाठी प्रत्येकी एक उपअभियंता नियुक्त केला आहे, ज्यांना खड्ड्यांच्या तक्रारी 24 तासांत सोडवल्या जातील याची खात्री करण्यास सांगितले आहे. यासह प्रत्येक प्रभागात मॅस्टिक कुकर मशिन तैनात करण्याची नागरी संस्था योजना आखत आहे.
एखाद्या खड्ड्याबाबत तक्रार आल्यास, उपअभियंत्यांना घटनास्थळी भेट देऊन कंत्राटदाराने 24 तासांच्या आता मॅस्टिक डांबराने खराब पॅच भरला आहे की नाही, याची खात्री करावी लागेल. तसेच त्यांना बाईकवरून रस्त्यांची तपासणी करण्याचे निर्देशही नागरी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. सध्या, कोणीही MyBMC Pothole FixIt ॲप, हेल्पलाइन नंबर (1916), चॅटबॉट किंवा प्लॅटफॉर्म 'X' द्वारे मुंबईमधील खड्ड्यांबाबत तक्रार नोंदवू शकतो. (हेही वाचा: Pune Rains: पुण्यातील रस्त्यावर चक्क पावसाच्या पाण्यावर तरंगताना आढळली व्यक्ती, व्हिडिओ व्हायरल)
पहा पोस्ट-