Mumbai: विना हेल्मेट गाडीवरून प्रवास करताना दिसल्या महिला पोलीस; वाहतूक विभागाने ठोठावला प्रत्येकी 500 रुपयांचा दंड

दादरजवळील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर या दोन पोलीस महिला हेल्मेटशिवाय गाडी चालवताना दिसल्या होत्या. राहुल बर्मन नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने हे छायाचित्र अपलोड केले होते.

विना हेल्मेट गाडीवरून प्रवास करणाऱ्या महिला पोलीस

मुंबईत दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणे हा गुन्हा आहे. या नियमाचे वारंवार उल्लंघन केल्यास चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो. वेळोवेळी पोलीस हेल्मेट न घालता गाडी चालवणाऱ्या लोकांकडून दंड वसूल करत असतात. आता बुधवारी मुंबई वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न घातल्याबद्दल दोन महिला पोलिसांना दंड ठोठावला. चुनाभट्टी पोलीस स्टेशन व वाहतूक विभागाच्या वतीने विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या महिला पोलिसांवर कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही महिला पोलीस कर्मचार्‍यांकडून प्रत्येकी ₹ 500/- ची रक्कम वसूल करण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलीस हँडलने ट्विटरद्वारे माहिती दिली.

दादरजवळील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर या दोन पोलीस महिला हेल्मेटशिवाय गाडी चालवताना दिसल्या होत्या. राहुल बर्मन नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने हे छायाचित्र अपलोड केले होते. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. (हेही वाचा: IIT Bombay Student Darshan Solanki Suicide Case: मुंबई पोलिस SIT टीम कडून आरोपी Arman Khatri च्या खोलीतून जप्त केले कटर!)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now