Mumbai Police Traffic Advisory for IPL 2024: आयपीएल सामन्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पलिसांकडून वाहतूकीत बदल

या सामन्यांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित राहतील, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते, त्यामुळे रहदारीचा गुंता टाळण्यासाठी वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आला असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

Mumbai Traffic | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर 1 आणि 7 एप्रिल रोजी होणाऱ्या IPL सामन्यांपूर्वी मुंबई वाहतूक पोलिसांनी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सामन्यांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित राहतील, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते, त्यामुळे रहदारीचा गुंता टाळण्यासाठी वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आला असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. मुंबई वाहतूक पोलिसांनी सांगितले की, वानखेडे स्टेडियमवर "नो पार्किंग सुविधा" आहेत, त्यामुळे प्रेक्षकांनी सामन्याला उपस्थित राहण्यासाठी सार्वजनिक वाहतूक वापरण्याचा सल्ला दिला आहे. 1 (सोमवार) आणि 7 एप्रिल (रविवार) रोजी दुपारी 12 ते रात्री 11:30 वाजेपर्यंत पार्किंगची सुविधा नसेल, असे त्यात म्हटले आहे. (हेही वाचा, CSK And MI Fans Clash in Kolhapur: मुंबई इंडियन्स चाहत्यांचा CSK समर्थकावर हल्ला, पीडितावर ICU मध्ये उपचार सुरु; दोघांना अटक,IPL 2024 ज्वर शिगेला)

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)