Tipu Sultan Maidan: मुंबई पोलिसांचा टिपू सुलतान मैदानाबाहेर मोठा फौजफाटा तैनात, वातावरण बिघडवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा
विश्व हिंदू परिषदेचा धोका लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी मालाडमधील मालवणी परिसरातील टिपू सुलतान मैदानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
विश्व हिंदू परिषदेचा धोका लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी मालाडमधील मालवणी परिसरातील टिपू सुलतान मैदानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. वातावरण बिघडवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. कुणालाही सोडले जाणार नाही, असा कडक इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
दरम्यान विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल मोठ्या प्रमाणात निदर्शनांसाठी ओळखले जातात. टिपू सुलतानच्या नावाने उद्यानाचे उद्घाटन आम्ही होऊ देणार नाही. महाराष्ट्रात अनेक नेते आहेत. त्यापैकी कोणावरही बागेचे नाव ठेवता येईल, असे विश्व हिंदू परिषद अध्यक्ष श्रीराज नाय यांनी सांगितले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)