Mumbai Police: वाढदिवसाच्या पार्टीत बिल देण्यावरुन वाद; एकाची हत्या, चौघांना अटक
या चौघांवर एका तरुणाची हत्या केल्याचा आरोप आहे. चारपैकी दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. उरलेले दोन आरोपी शाहरुख आणि निशार यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या चौघांना अटक केली आहे. या चौघांवर एका तरुणाची हत्या केल्याचा आरोप आहे. चारपैकी दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. उरलेले दोन आरोपी शाहरुख आणि निशार यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या चौघांनी मिळून साबीर नावाच्या तरुणाची हत्या केल्याचा आरोप आहे. वाढदिवसाच्या पार्टीत बिल देण्यावरुन या सर्वांमध्ये वाद झाला होता. या वादातून या चौघांनी साबीर याची हत्या केल्याचा आरोप आहे.
शिवाजीनगर पोलिसांनी चारही आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम 302, 323, 109 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Love Jihad: आयपीएलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटर Mohsin Khan च्या भावावर 'लव्ह जिहाद’चा आरोप; खेळाडूनेही बलात्कार केल्याचा पिडीतेचा दावा (Watch Video))
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)