Mumbai Police: जोगेश्वरी परिसरात ८ वर्षीय मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

मुलगी आणि आई दोघीच राहतात. मुलीची आई कामाला जाते. त्यामुळे मुलीच्या देखभालीसाठी कोणी नसल्याने ती मुलीला आरोपीच्या घरी सोडत असे.

Stop Rape (Representative image)

मुंबई पोलिसांनी जोगेश्वरी परिसरातून एका 53 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपी आणि पीडिता एकाच इमारतीमध्ये राहतात. मुलगी आणि आई दोघीच राहतात. मुलीची आई कामाला जाते. त्यामुळे मुलीच्या देखभालीसाठी कोणी नसल्याने ती मुलीला आरोपीच्या घरी सोडत असे. आरोपी आणि पीडिता व आई यांच्यात कौटुंबीक संबंध होते. दरम्यान, मोठ्या विश्वासाने ती मुलीला त्याच्याकडे सडून जात होती. मात्र, कुंपणानेच शेत खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

एके दिवशी पीडितेने आईला घडला प्रकार सांगितला. त्यानंतर आईने पोलिसांत जाऊन तक्रार दिली. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी विरोधात आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 376 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)