Mumbai News: बिल्डरचे अपहरण करून 10 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांना मुंबई पोलिसांकडून अटक

एका बिल्डरचे अपहरण करून कुटुंबाकडून १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

Kidnaping | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mumbai News: एका बिल्डरचे अपहरण करून कुटुंबाकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना मुंबईतील भायखळा येथील आहे. गुरुवारी बिल्डरचे अपहरण करण्यात आले आहे. गोवंडीतून बिल्डरची गुड्यांकडून सुटका करण्यात आली. पोलिसांनी गुंड युसूफ कादरी उर्फ ​​बचकाना आणि नौशाद याच्यासह दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाने अटक केली. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाने शुक्रवारी संध्याकाळी मानखुर्द डम्पिंग ग्राऊंडजवळील बांधकाम व्यावसायिकाची सुटका केली जिथे त्याला बांधून मारहाण करण्यात आली होती. पोलिसांनी सुटका केल्यानंतर बिल्डरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी बचकाना आणि एका साथीदाराला अटक केली. पोलीस आणखी एका साथीदाराच्या शोधात आहेत

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement