Mumbai News: खेळ जीवावर बेतला! कारमध्ये अडकलेल्या बहीण भावाचा गुदमरुन मृत्यू; अँटॉप हिल परिसरातील घटना
मुंबईच्या अँटॉप हिल परिसरातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. कारमध्ये अडकून दोन चिमुकल्या बहीण- भावाचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. बुधवारी ही घटना घडली.
Mumbai News: साजिद मोहम्मद शेख, (वय ७) आणि रीना शेख (वय,५) हे दोघेही अँटॉप हिल येथे घरापासून थोड्या अंतरावर खेळत होते. मात्र, काही वेळाने ते नातेवाईकांना दिसेणासे झाले. नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार केली असता. घरापासून 50 मीटर अंतरावर असलेल्या एका बंद कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. मुले खेळता खेळता गाडीमध्ये बसले असावेत, गाडी लॉक झाल्यामुळे श्वास गुदमरुन (Suffocate) त्यांचा मृत्यू (Death) झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, दोन्ही मुलांचे मृतदेह सायन हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. अँटॉप हिल (Antop Hill)पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (हेही वाचा :Mumbai Fire : अँटॉप हिल परिसरात सिलिंडरचा स्फोट, दोन जखमी; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल )
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement