Mumbai News: आज पासून मराठीत सूचना फलक नसलेल्या हॉटेल,दुकानांविरोधात कारवाई; BMC ने जारी केलं निर्देश

BMC (बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन) आजपासून मुंबईतील दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापनांवर देवनागरी लिपीत मराठी सूचनाफलक नसलेल्या दुकानांविरोधात मोहीम सुरू करणार आहे

BMC (File Image)

 Mumbai News:  BMC (बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन) आजपासून मुंबईतील दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापनांवर देवनागरी लिपीत मराठी सूचनाफलक नसलेल्या दुकानांविरोधात मोहीम सुरू करणार आहे. बीएमसीने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबत निर्देश दिले होते. निर्देशांचे पालन न करणाऱ्या अशा आस्थापनांवर कारवाई करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आली आहे. असे बीएमसीने पत्रकात म्हटले आहे.  सर्वोच्च न्यायालयाने 25 नोव्हेंबरपर्यंत देवनागरी फलक लावण्यासाठी मुदत दिली होती, परंतु नागरी संस्था 28 नोव्हेंबर, मंगळवारपासून कारवाई सुरू करत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now