The Burning Car: दादर परिसरात भरधाव कारला आग, सुदैवाने कोणतीही जीवीतहानी नाही

मुंबईत दादरच्या टिळक पुलावर मध्यरात्री एका भरधाव स्विफ्ट डिजायर मोटर कारने अचानक पेट घेतला.

Fire | Images for symbolic purposes only । (Photo Credits: Pixabay)

 The Burning Car: मुंबईतील दादर परिसरात मध्यरात्री भरधाव कारने (स्विप्ट डिझायर मोटर कार) अचनाक पेट घेतला. कार मध्ये चार प्रवाशी होते. ते माहिम वरून आंबेडकर मार्गावर जात असताना कारमधून धूर येवू लागला. टिळक पुलावर आल्यावर काही वेळानंतर कारने थेट पेट घेतला. अचानक आग लागल्यामुळे प्रवाशांचा जीव कासावीस झाला. वेळीच सावध राहत प्रवाशांनी अग्निशमन दलाला फोन केला. अशी घटना समजता अग्निशमन दलाच्या गाड्या दादर येथे दाखल झाल्या कारने जास्त पेट घेतल्या मुळे आग नियत्रंणात येत नव्हती. काही वेळानंतर आग शांत झाली.  रस्त्यावर कारला आग लागल्यामुळे इतर स्थानिकांना कारमधील धूरचा त्रास होवू लागला.रस्त्यावर इतर वाहतुकींना देखील काही काळ थांबाबे लागले. या घटनेक कोणतीही जीवीतहानी झाली नाही परंतु कार संपुर्ण जळाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement