Mumbai Metro Line 3 First Look: मुंबईतील पहिली अंडरग्राऊंड मेट्रो अॅक्वा लाईन 3 ची इथे पहा पहिली झलक; 4 ऑक्टोबर पासून प्रवाशांसाठी होणार सुरू (See Pics and Videos)
आरे आणि BKC ला जोडणारी मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो अॅक्वा लाइन चंआज , मंगळवार, 24 सप्टेंबर रोजी अनावरण करण्यात आलं आहे. आरे ते BKC पर्यंत पसरलेल्या मेट्रो एक्वा लाइन 3 चा पहिला टप्पा 4 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे.
मुंबई मध्ये लवकरच पहिली अंडरग्राऊंड मेट्रो सेवा सुरू होत आहे. Metro Aqua Line 3 असं या सेवेचं नाव असून आरे ते बीकेसी दरम्यान पहिला पट्टा आज 24 सप्टेंबरला सुरू होत आहे. दरम्यान या मार्गिकेवर प्रवास 4 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. एकूण 33.5 किमीचा हा कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो 3 प्रोजेक्ट आहे. यामध्ये अंडरग्राऊंड 26 स्थानकं आहेत. दरम्यान ही मेटो स्थानकं शहरात महत्त्वाच्या ठिकाणी लोकलची रेल्वे स्टेशन्स, मेट्रो स्टेशन्स यांनाही जोडणार आहेत.
पहा Metro Aqua Line 3 ची पहिली झलक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)