Mumbai Metro 2B Trail Run Video: मुंबई मेट्रो लाइन 2B ची ट्रायल रन सुरू; मानखुर्द ते चेंबूर प्रवास होणार जलद आणि सुलभ
मुंबई मेट्रो लाइन 2B चा ट्रायल रन मानखुर्द ते चेंबूरदरम्यान सुरू झाला आहे. 5.5 किमी अंतरावरील ही येलो लाइन पाच स्थानकांसह जलद प्रवासाची हमी देते, तर बीईएमएलने तयार केलेल्या आधुनिक सुविधायुक्त डब्यांचा वापर करण्यात येतो आहे.
मुंबईतील दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबई मेट्रो लाइन 2B, ज्याला येलो लाइन म्हणूनही ओळखले जाते, तिचा प्रारंभिक ट्रायल रन (Mumbai Metro 2B Trail Run Video) बुधवारी (16 एप्रिल) सुरू झाला. ही मेट्रो लाईन मानखुर्द येथील मंडळे कारशेडपासून चेंबूरमधील डायमंड गार्डनपर्यंतच्या 5.5 किमी अंतराचा समावेश करते आणि या मार्गामुळे स्थानिकांना अधिक जलद आणि सुलभ प्रवासाचा लाभ मिळणार आहे. या चाचणीचा व्हिडिओ आपण येते पाहू शकता.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) च्या माहितीनुसार या मार्गावर पाच स्थानके असतील – मंडळे, मानखुर्द, बीएसएनएल, शिवाजी चौक आणि डायमंड गार्डन. या मार्गावरचे सिव्हिल व इलेक्ट्रिकल काम पूर्ण झाले असून, ओव्हरहेड वायरिंगसह ट्रायल ऑपरेशन्सला सुरुवात करण्यात आली आहे.
सध्या ब्रेकिंग सिस्टम, अॅक्सेलरेशन, सिग्नलिंग, टेलिकम्युनिकेशन आणि उर्जेचा वापर यांचा सर्वांगीण स्टॅटिक आणि डायनॅमिक चाचण्यांचा भाग म्हणून तपास केला जात आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)