Mumbai Local Update: मुंबईकरांना दिलासा; उद्यापासून CSMT वरून पहाटे 4.35 वाजता सुटणार पहिली फास्ट लोकल

कल्याण आणि खोपोली दरम्यानच्या मार्गासाठी पूर्वीप्रमाणेच वेळ राखून ही सेवा कल्याणच्या पलीकडे स्लो लोकल म्हणून सुरू राहील.

मुंबई लोकल ट्रेन (Photo Credits: PTI)

मध्य रेल्वेने (CR) ऑपरेशनल कारणांमुळे पहाटे 4.24 ची स्लो सीएसएमटी-खोपोली उपनगरी लोकल सेवा अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या म्हणजेच 10 ऑगस्टपासून ही प्रभावी सेवा, जलद लोकल म्हणून काम करेल. यामुळे नागरिकांचा बराचसा प्रवासाच्या वेळा वाचणार आहे. ही जलद गाडी सीएसएमटी येथून पहाटे 4.35 वाजता सुटेल. सुधारित वेळापत्रकानुसार, ट्रेन भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण स्थानकावर थांबेल. ही गाडी पहाटे 5.53 पर्यंत कल्याणला पोहोचेल. कल्याण आणि खोपोली दरम्यानच्या मार्गासाठी पूर्वीप्रमाणेच वेळ राखून ही सेवा कल्याणच्या पलीकडे स्लो लोकल म्हणून सुरू राहील. यापूर्वी पहिली जलद लोकल पहाटे 5.20 वाजता धावत होती. (हेही वाचा: मुंबई लोकलच्या लेडीज कोच मध्ये सुरक्षा वाढणार; महिला प्रवाशांना थेट Train Manager शी बोलण्यासाठी मिळणार Talk-Back System)

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement