Mumbai Local Update: मध्य रेल्वेचे मोटरमॅन 4 मे पासून मूक निषेध करण्याच्या तयारीत; ADAS Camera Installation वरून नाराज

मध्य रेल्वे (CR) कडून विक डेजला १,८०० हून अधिक उपनगरीय सेवा चालवल्या जातात आणि दररोज सुमारे 38 लाख प्रवासी या सेवांचा वापर करतात.

Mumbai Local (फोटो सौजन्य - फेसबुक)

मोटरमन कॅबिन मध्ये अलिकडेच अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) अंतर्गत कॅमेरे बसवण्यात आल्यामुळे वाढत्या दबावाचे कारण देत मध्य रेल्वे (CR) मुंबई विभागातील मोटरमन पुन्हा एकदा 4 मे पासून मूक निषेध करण्याच्या तयारीमध्ये आहेत.  fpj च्या वृत्तानुसार,सूत्रांनी दिलेली माहिती पाहता रविवारी सेवांची संख्या तुलनेने कमी असेल, त्यामुळे आंदोलनाचा मोठा परिणाम होण्याची अपेक्षा नाही. परंतु जर ते सोमवारीही सुरू राहिले तर त्याचा उपनगरीय सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वे (CR) कडून विक डेजला १,८०० हून अधिक उपनगरीय सेवा चालवल्या जातात आणि दररोज सुमारे 38 लाख प्रवासी या सेवांचा वापर करतात.

मध्य रेल्वेचे मोटारमॅन संपाच्या तयारीत?

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement