Mumbai Local Update: आटगाव आणि आसनगाव स्थानकादरम्यान बोल्डर कोसळला; कसारा-कल्याण मार्गावर परिणाम, सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु

आटगाव आणि आसनगाव स्थानकादरम्यान बोल्डर घसरला आहे, त्यामुळे कसारा आणि कल्याण दरम्यानच्या मार्गावर परिणाम झाला आहे.

Mumbai Local | (Photo Credit - Twitter)

Mumbai Local Update:  दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये दुपारी मध्य रेल्वे मार्गावरील ठाकुर्ली येथे ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल वाहतुक ठप्प झाली होती. त्यानंतर अनेक गाड्यांना उशीर झाला परिणामी, विविध स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. आता माहिती मिळत आहे की, आटगाव आणि आसनगाव स्थानकादरम्यान बोल्डर कोसळला आहे, त्यामुळे कसारा आणि कल्याण दरम्यानच्या मार्गावर परिणाम झाला आहे. या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSTM) च्या दिशेने जाणाऱ्या अपलाइनवरील ट्रेन सेवा निलंबित करण्यात आली आहे, तर डाउनलाइन कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू आहे. बोल्डर हटवण्याचे काम प्रगतीपथावर असून, सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने याबाबत माहिती दिली आहे. (हेही वाचा: Huge Rush at Ghatkopar Station: मध्य रेल्वे मार्गावर लोकल सेवेमध्ये विलंब; घाटकोपर स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now