Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वे कडून माहीम-वांद्रे दरम्यान 11-13 एप्रिल दरम्यान Night Blocks ची घोषणा; लोकल, लांब पल्ल्यांच्या अनेक गाड्यांवर होणार परिणाम

पश्चिम रेल्वेवर 11-12 एप्रिल रोजी रात्री 11 ते सकाळी 8.30 पर्यंत अप आणि डाऊन स्लो मार्गावर आणि सकाळी 12.30 ते सकाळी 6.30 पर्यंत डाउन फास्ट मार्गावर ब्लॉक असेल. 12-13 एप्रिल रोजी रात्री 11.30 ते सकाळी 9 पर्यंत अप, डाऊन स्लो आणि डाऊन फास्ट मार्गावर ब्लॉक असेल, तर अप फास्ट मार्गावर रात्री 11.30 ते सकाळी 8 पर्यंत ब्लॉक असेल.

Mumbai Local (Photo Credit: Wikimedia Commons)

पश्चिम रेल्वेने माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान माहीम खाडीवरील पूलाच्या Re-girdering कामांसाठी 11-12 आणि 12-13 एप्रिलच्या मध्यरात्री मोठा ब्लॉक जाहीर केला आहे. रेल्वे ऑपरेशन्सची सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी पुल क्रमांक 20च्या पुनर्बांधणीसाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11-12 एप्रिल रोजी रात्री 11 ते सकाळी 8.30 पर्यंत अप आणि डाऊन स्लो मार्गावर आणि सकाळी 12.30 ते सकाळी 6.30 पर्यंत डाउन फास्ट मार्गावर ब्लॉक असेल. 12-13 एप्रिल रोजी रात्री 11.30 ते सकाळी 9 पर्यंत अप, डाऊन स्लो आणि डाऊन फास्ट मार्गावर ब्लॉक असेल, तर अप फास्ट मार्गावर रात्री 11.30 ते सकाळी 8 पर्यंत ब्लॉक असेल. या काळात 300 पेक्षा अधिक रेल्वेसेवा स्थगित करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement