मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवासी लटकला, हवेत तरंगला, व्हिडिओ व्हायरल

मुंबई लोकल प्रवास म्हणजे मुंबईकरांसाठी दररोज युद्धाचा प्रसंग. त्यातच जर पावसाळा सुरु झाला तर या दैनंदिन युद्धाचा संघर्ष आणखी वाढतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात मुंबई लोकल ट्रेनमध्ये मिळालेली जागा टिकविण्यासाठी अटोकाट प्रयत्न करणाऱ्या एका प्रवाशाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.

मुंबई लोकल प्रवास म्हणजे मुंबईकरांसाठी दररोज युद्धाचा प्रसंग. त्यातच जर पावसाळा सुरु झाला तर या दैनंदिन युद्धाचा संघर्ष आणखी वाढतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात मुंबई लोकल ट्रेनमध्ये मिळालेली जागा टिकविण्यासाठी अटोकाट प्रयत्न करणाऱ्या एका प्रवाशाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. लोकल ट्रेन स्टेशनला येताच डब्यातून प्रवासी खाली उतरत असताना हा व्यक्ती मध्येच उभा होतो. ज्यामुळे आतील लोकांच्या रेठ्याने तो बाहेर फेकला जातो आहे. पण त्याने लोकलचे छत पकडून ठेवल्यामुळे तो हवेत तरंगू लागतो. लोकल ट्रेनमध्ये स्पायडरमॅन आल्याचाच काहीसा भास हा व्हिडिओ पाहताना होतो.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now