Mumbai: घरमालकांनी भाडेकरूंची माहिती सिटीझन पोर्टलवर कळविणे आवश्यक; आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई

भाडेकरूंच्या वेशात दहशतवादी, समाजविरोधी घटकांकडून विध्वंसक कृत्ये, दंगल, भांडण घडू नये म्हणून घरमालक, भाडेकरूंची तपासणी आवश्यक आहे.

Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या कोणत्याही घराचा, मालमत्तेचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक घरमालक, जागा मालकांनी कोणत्याही व्यक्तीला राहण्यासाठी जागा भाड्याने दिली आहे किंवा सवलत दिली असेल, तर त्या भाडेकरूचा सर्व तपशील www.mumbaipolice.gov.in या सिटीझन पोर्टलवर ऑनलाइन कळवावा, असे पोलीस उपायुक्त (अभियान) विशाल ठाकूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

भाडेकरूंच्या वेशात दहशतवादी, समाजविरोधी घटकांकडून विध्वंसक कृत्ये, दंगल, भांडण घडू नये म्हणून घरमालक, भाडेकरूंची तपासणी आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत. भाडेकरू परदेशी व्यक्ती असेल, तर घरमालक व परदेशी व्यक्ती यांनी नाव, राष्ट्रीयत्व, पासपोर्टचा तपशील, व्हीसा क्रमांक, श्रेणी, ठिकाण, जारी करण्याची तारीख, वैधता नोंदणीचे ठिकाण आणि शहरात राहण्याचे कारण नमूद करणे आवश्यक आहे. हा आदेश 5 सप्टेंबर 2023 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहितेनुसार दंडनीय असेल, असेही पोलिस उपायुक्त ठाकूर यांनी म्हटले आहे. (हेही वाचा: Farmers Protest In Mumbai: मुंबईमध्ये 26 जुलै रोजी शेतकरी आंदोलन; जालना-नांदेड द्रुतगती मार्गाच्या अन्यायकारक मोबदल्याविरोधात नोंदवणार निषेध)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now