Mumbai Hospitals Receive Bomb Threats: मुंबईतील 50 हून अधिक रुग्णालयांना बॉम्बच्या धमक्या; व्हीपीएन नेटवर्कवरून आले ईमेल, तपास सुरु
व्हीपीएन नेटवर्क वापरून धमकीचे ईमेल पाठवले जातात. मेल पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख आणि धमकीचा उद्देश अद्याप कळू शकलेला नाही.
Mumbai Hospitals Receive Bomb Threats: आज देशातील अनेक विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. आता मुंबईतील 50 हून अधिक हॉस्पिटल्सना बॉम्बच्या धमक्या आहेत. याबाबत हिती देताना मुंबई पोलिसांनी सांगितले की, जसलोक हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, सेव्हन हिल हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटलसह मुंबईतील 50 हून अधिक हॉस्पिटल्सना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. व्हीपीएन नेटवर्क वापरून धमकीचे ईमेल पाठवले जातात. मेल पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख आणि धमकीचा उद्देश अद्याप कळू शकलेला नाही. (हेही वाचा: Bomb Blast Threat: देशातील Patna, Jaipur, Coimbatore, Vadodara यांसारख्या अनेक विमानतळांना बॉम्बची धमकी; कडक सुरक्षा उपाय लागू)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)