Mumbai Hit-and-Run: चिंचपोकळी पुलावर टेम्पोने दिली 38 वर्षीय व्यक्तीला धडक; चालकाचे घटनास्थळावरून पलायन, पीडितेचा मृत्यू

जखमी मयूर यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Photo Credit- X

Mumbai Hit-and-Run: मुंबईमधून पुन्हा एकदा हिट-अँड-रनचे प्रकरण समोर आले आहे. शहरातील चिंचपोकळी पुलावर मयूर प्रदीप लाडीवाल (वय 38) या व्यक्तीला एका टेम्पोने धडक दिली. यानंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. जखमी मयूर यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पीडितेच्या मृत्यूनंतर, आग्रीपाडा पोलिसांनी बीएनएस आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 281, 125 (बी), 106 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. (हेही वाचा: Pune Shocker: पुण्यातील लवळे-नांदे रोडवर कुटुंबावर 40 जणांचा हल्ला; रॉड, काठ्या, दगड घेऊन केला पाठलाग)

मुंबईमधून समोर आले हिट-अँड-रनचे प्रकरण-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)