Mumbai Gujarat स्पेशल 5 ट्रेन वर्षाअखेरीस प्रवाशांसाठी चालवल्या जाणार, येथे पहा वेळापत्रक
पश्चिम रेल्वेकडून वर्षाअखेरीस 4 स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत. तर या स्पेशल ट्रेनसाठी गेल्या काही काळापासून स्थानिक प्रवाशांकडून मागणी केली जात होती. त्यानुसार आता मुंबई आणि गुजरात दरम्यान या स्पेशल ट्रेन धावणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वेकडून वर्षाअखेरीस 4 स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत. तर या स्पेशल ट्रेनसाठी गेल्या काही काळापासून स्थानिक प्रवाशांकडून मागणी केली जात होती. त्यानुसार आता मुंबई आणि गुजरात दरम्यान या स्पेशल ट्रेन धावणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ प्रवक्ते सुनिल ठाकूर यांनी असे म्हटले की, या लांब पल्ल्याच्या ट्रेन असणार आणि अनारक्षित असतील. काही प्रवाशांकडून या ट्रेनची मागणी केली जात होती. त्यामुळे त्यांना आकराव्या तासाला तिकिट खरेदी करुन प्रवास करता येईल असे त्यांचे म्हणणे होते.
पाच ट्रेन चालवल्या जाणार असून त्यामध्ये गाडी क्रमांक 09159 वांद्रे-वापी, ट्रेन क्रमांक 09144 वापी-विरार शटल, ट्रेन क्रमांक 19001/19002 विरार-सुरत, ट्रेन क्रमांक 09143 विरार-वलसाड, ट्रेन क्रमांक 09160 वलसाड-वांद्रे टीएनएन.
Tweet: