Mumbai-Goa Vande Bharat Video: खुशखबर! लवकरच सुरु होणार मुंबई ते गोवा वंदे भारत ट्रेन; पहा ट्रायल व्हिडिओ (Watch)
मुंबई गोवा वंदे भारत ट्रेन ही मुंबईहून धावणारी चौथी वंदे भारत एक्सप्रेस असेल.
देशाला लवकरच आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार आहे. अलीकडेच पंतप्रधान मोदींनी गुवाहाटी ते न्यू जलपाईगुडी दरम्यान, देशातील 18व्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर आता देशातील 19वी वंदे भारत ट्रेन मुंबई ते गोवा मार्गावर धावणार आहे. मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन 3 जून रोजी होऊ शकते असे मानले जात आहे. त्यानंतर 4 जूनपासून ही ट्रेन नियमितपणे धावणे अपेक्षित आहे. रेल्वे बोर्ड ही ट्रेन 8 किंवा 16 डब्यांमध्ये चालवू शकते. मुंबई-गोवा वंदे भारतची चाचणी नुकतीच पूर्ण झाली आहे. मुंबई गोवा वंदे भारत ट्रेन ही मुंबईहून धावणारी चौथी वंदे भारत एक्सप्रेस असेल. यापूर्वी मुंबई-साबरमती, मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी दरम्यान वंदे भारत गाड्या चालवण्यात आल्या आहेत. गोव्यासाठी ही पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आहे. कोकण रेल्वेचे सीपीआरओ एलके वर्मा म्हणाले की, चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. गोव्यातील पहिली वंदे भारत ट्रेन मडगाव ते सीएसएमटी धावणार आहे. (हेही वाचा: दिलासादायक! लवकरच पुणे-सोलापूर मार्गावर धावणार इलेक्ट्रिक बस; चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सुरू)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)