Mumbai-Goa Vande Bharat Schedule: येत्या 4 जूनपासून सुरु होणार मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस; जाणून घ्या वेळ, दर आणि थांबे
आठ डब्यांच्या या ट्रेनला 11 थांबे असतील आणि 586 किमी अंतर कापण्यासाठी आठ तासांपेक्षा कमी वेळ लागेल.
गोवा-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन 3 जून रोजी होणार आहे. मडगाव जंक्शन येथून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. ही ट्रेन 4 जूनपासून लोकांच्या सेवेत दाखल होणार आहे. आठ डब्यांच्या या ट्रेनला 11 थांबे असतील आणि 586 किमी अंतर कापण्यासाठी आठ तासांपेक्षा कमी वेळ लागेल. सध्या या मार्गावरील सर्वात वेगवान ट्रेन तेजस एक्सप्रेस आहे. तेच अंतर कापण्यासाठी तेजसला 8 तास 50 मिनिटे लागतात. मुंबई-मडगाव चेअर कारचे भाडे 1,745 रुपये आहे आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे 3,290 रुपये आहे. यामध्ये फूड चार्जेसचा समावेश आहे. वंदे भारत गाडी 7 तास 50 मिनिटांमध्ये मुंबईहून मडगावला पोहोचेल.
या वंदे भारत एक्सप्रेसला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम असे 7 व्यावसायिक थांबे असतील. या गाडीला रोहा येथे तांत्रिक थांबाही असेल. तथापि, येथे बोर्डिंग आणि डिबोर्डिंगला परवानगी दिली जाणार नाही. ही गाडी सीएसएमटीहून पहाटे 5.25 वाजता निघून दुपारी 1.15 वाजता मडगावला पोहोचेल. त्यानंतर ती मडगावहून दुपारी 2.35 वाजता निघून रात्री 10.25 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. (हेही वाचा: तेलंगणामध्ये बांधले जात आहे जगातील पहिले 3D प्रिंटेड हिंदू मंदिर; जाणून घ्या काय आहे खास