Mumbai Crime: दादर रेल्वे स्थानकावर महिलेले चालत्या ट्रेनमधून फेकुन दिले, आरोपीला अटक

दादर जीआरपी पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मुंबई रेल्वे पोलिसांनी दिली.

Arrested | (File Image)

मुंबईच्या दादर स्थानकावर ट्रेनमधून फेकून दिल्याने 29 वर्षे वयाची एक महिला प्रवाशी जखमी झाली. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसच्या लेडीज डब्यात 6 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. आरोपीने पीडितेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने प्रतिकार केल्यावर आरोपीने तिला चालत्या ट्रेनमधून ढकलून दिले. जीआरपी पोलिसांनी आरोपीला सीएसएमटी स्थानकातून अटक केली. दादर जीआरपी पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मुंबई रेल्वे पोलिसांनी दिली.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now