Mumbai Crime: मुंबईमध्ये 40 वर्षीय गुजराती चित्रपट अभिनेता आणि निर्मात्याने केला 17 वर्षांच्या मुलीचा विनयभंग; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

या प्रकरणी मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Abuse | File Image

मुंबईमधील डीएन नगर पोलिसांनी मंगळवारी एका 40 वर्षीय गुजराती चित्रपट अभिनेता आणि निर्मात्याला विनयभांगाच्या आरोपाखाली अटक केली. आरोप आहे की, त्याने एका 17 वर्षांच्या मुलीला चित्रपटात काम करण्याची ऑफर देण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग केला. या प्रकरणी मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन पिडीत मुलगी ही गुजरातची रहिवासी आहे. आरोपीही मूळचा गुजरातचा असून तो सध्या अंधेरीत राहतो. आरोपीची पीडितेच्या काकांशी ओळख होती. आपल्याला चित्रपटात काम करण्याची संधी मिळेल या आशेने तरुणीने आरोपीला आपली ओळख करून दिली होती. अंधेरीतील हॉटेलच्या खोलीत एकटी असलेल्या मुलीचा फायदा घेत आरोपीने सोमवारी तिचा विनयभंग केला. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा: Pune Police: स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय, पुणे पोलिसांनी केला पदार्फाश)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)