Mumbai: कस्तुरबा रुग्णालयातून पळून गेलेल्या Covid-19 रुग्णाला घेतले ताब्यात; गुन्हा दाखल
खान याला मानखुर्द पोलिसांनी 30 जुलै रोजी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
मध्य मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामधून उपचारासाठी दाखल एक चोर असलेला कोविड रुग्ण पळून गेल्याची घटना आज समोर आली होती. नझीम अयुब खान असे त्याचे नाव असून, त्याच्यावर आयपीसी कलम 224 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शोध सुरू केला होता. आता मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे की, आग्रीपाडा पोलीस स्टेशन सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून एपीआय आंबेकर, पी.सी. फडतरे, कदम आणि ठाकरे यांनी सापळा रचून सायन हायवे ब्रिजजवळ खान याला ताब्यात घेतले आहे.
खान याला मानखुर्द पोलिसांनी 30 जुलै रोजी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर अनिवार्य वैद्यकीय तपासणी दरम्यान, त्याला कोविड-19 ची लागण झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याला कस्तुरबा रुग्णालयाच्या 14 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते, तिथून तो पळून गेला होता.