Mumbai Car Fire Video: अंधेरी पूर्व भागात चारचाकीने घेतला पेट; सोशल मीडीयात व्हिडिओ वायरल

अंधेरी भागात कारला आग लागल्याची ही घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत जीवितहानीचं वृत्त समोर आलेले नाही.

Car | Twitter

मुंबई मध्ये एका कारने पेट घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल झाला आहे. 22 सेकंदाचा व्हिडिओ सध्या झपाट्याने शेअर होत आहे. अंधेरी भागात कारला आग लागल्याची ही घटना समोर आली आहे. एका ट्वीटर युजरने आपण कामाला निघताना रस्त्यात एका कारला  आग लागल्याचं दिसलं. अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवल्याचं म्हटलं आहे. दरम्यान आगीमागील कारण अस्पष्ट आहे. यावेळेस मुंबई मध्ये हलक्या पावसाच्या सरी देखील बरसत होत्या.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now