Mumbai Car Fire Video: अंधेरी पूर्व भागात चारचाकीने घेतला पेट; सोशल मीडीयात व्हिडिओ वायरल
अंधेरी भागात कारला आग लागल्याची ही घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत जीवितहानीचं वृत्त समोर आलेले नाही.
मुंबई मध्ये एका कारने पेट घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल झाला आहे. 22 सेकंदाचा व्हिडिओ सध्या झपाट्याने शेअर होत आहे. अंधेरी भागात कारला आग लागल्याची ही घटना समोर आली आहे. एका ट्वीटर युजरने आपण कामाला निघताना रस्त्यात एका कारला आग लागल्याचं दिसलं. अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवल्याचं म्हटलं आहे. दरम्यान आगीमागील कारण अस्पष्ट आहे. यावेळेस मुंबई मध्ये हलक्या पावसाच्या सरी देखील बरसत होत्या.
पहा ट्वीट
#Mumbairains | While on my way to work today afternoon, saw this car on fire just outside Andheri East station amid light showers. Swift action taken by @MumbaiPolice #Mumbaifirebrigade to douse the flames. pic.twitter.com/JUwsYv6hHq
— KC (@ChundawatKeshav) July 4, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 04, 2023 05:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

