Mumbai Bomb Threat: मुंबई पोलिस हेल्पलाईन नंबर 112 वर आला धमकीचा खोटा कॉल; FIR दाखल
पोलिसांना फोन आल्यानंतर लगेचच स्थानिक पोलिस आणि बॉम्बशोधक पथकाला सतर्क करण्यात आले आणि त्यांना तात्काळ तैनात करण्यात आले. पण कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
मुंबई पोलिसांचा हेल्पलाईन नंबर 112 वर धमकीचा खोटा फोन आल्याने आज शहरात पुन्हा खळबळ उडाली होती. भारत-पाक तणावादरम्यान अनेक ठिकाणी बॉम्बस्फोटाच्या धमकीचे कॉल्स येत आहेत. अशात आज राजीव सिंग असे स्वतःची ओळख सांगणारऱ्याने दावा केला की त्याने जेजे मार्ग परिसरातील एका व्यक्तीला शहरात बॉम्बस्फोट घडवण्याबद्दल बोलताना ऐकले. पोलिसांना फोन आल्यानंतर लगेचच स्थानिक पोलिस आणि बॉम्बशोधक पथकाला सतर्क करण्यात आले आणि त्यांना तात्काळ तैनात करण्यात आले. पण कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. "अधिकाऱ्यांना नंतर ही माहिती खोटी असल्याचे आढळून आले आणि त्यांनी राजीव सिंगविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे," असे मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई पोलिसांचा हेल्पलाईन नंबर 112 वर धमकीचा खोटा फोन
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement