Mumbai BEST Pass New Rates: मुंबईमध्ये 1 मार्चपासून बेस्टच्या सुपर सेव्हर बस पास दरांमध्ये 5-10% सुधारणा; जाणून घ्या नवे दर
उदाहरणार्थ, 9 रुपये किमतीचा एक दिवसाचा, प्रवाशांना 6 रुपये बस भाड्यापर्यंत दोन्ही दिशेने प्रवास करण्याची परवानगी देणारा पास बंद करण्यात आला आहे.
Mumbai BEST Pass Revision: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST) ने सुपर सेव्हर बस पास दरांमध्ये 5-10% सुधारणा जाहीर केली आहे, जी 1 मार्चपासून लागू होणार आहे. याशिवाय, दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्यासाठी अनेक पास श्रेणी काढून टाकण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, 9 रुपये किमतीचा एक दिवसाचा, प्रवाशांना 6 रुपये बस भाड्यापर्यंत दोन्ही दिशेने प्रवास करण्याची परवानगी देणारा पास बंद करण्यात आला आहे. याबाबत बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'एप्रिल 2023 पासून कार्यरत असलेल्या विद्यमान बस पास योजनेत विविध गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या आहेत. हा बदल केवळ प्रवास सुलभ करत नाही, तर दररोज तिकीट खरेदी करण्याच्या तुलनेत तुम्हाला 60 % पर्यंत पैशांची बचत करण्यात मदत करतो. एप्रिल 2023 मध्ये बेस्टने अधिकारी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वस्त बस पास सुरू केले होते. अद्ययावत पास योजनेमध्ये विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलती आणि प्रोत्साहनांसह दैनिक ते साप्ताहिक आणि मासिक पासांचा समावेश आहे. (हेही वाचा: Workers to Get Household Items: कोल्हापूर जिल्ह्यातील कामगारांना मिळणार गृहपयोगी वस्तू संच; थाळ्या, वाटया, ग्लास, प्रेशर कुकर आदींचा समावेश, जाणून घ्या प्रक्रिया व कुठे कराल नोंदणी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)