Mumbai: मांजरांना खिळे असलेल्या काठीने मारहाण; ज्येष्ठ नागरिकावर गुन्हा दाखल (Watch)
जस्ट स्माइल चॅरिटेबल ट्रस्ट नावाच्या संस्थेने प्राण्यांच्या क्रूरतेच्या या प्रकरणाबाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती
दक्षिण मुंबईतून प्राण्यांवरील अत्याचाराचे एक प्रकरण समोर आले आहे. गिरगाव येथील एका ज्येष्ठ नागरिकावर आपल्या परिसरातील मांजरांना खिळे असलेल्या काठीने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या या कृत्यामुळे परिसरातील अनेक मांजर जखमी झाले आहेत. या वृद्ध व्यक्तीला मांजर अजिबात आवडत नाही, म्हणून तो त्यांना काठीने मारून हाकलून लावायचा. जस्ट स्माइल चॅरिटेबल ट्रस्ट नावाच्या संस्थेने प्राण्यांच्या क्रूरतेच्या या प्रकरणाबाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर आरोपीला भविष्यात असे कृत्य न करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतरही त्याने मांजरांबद्दलची क्रूर वृत्ती सोडली नाही आणि मांजरांना मारहाण करत राहिला. अखेर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा: एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारणाऱ्या माकडांचा पाठलाग करणारा बिबट्याचा व्हिडीओ, IFS अधिकाऱ्याने केला शेअर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)