Andheri East By Elections Date: मुंबई मध्ये पहिल्यांदा निवडणूकीच्या रिंगणात भिडणार शिंदे विरूद्ध उद्धव ठाकरे गट; 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक

रमेश लटके यांचं हृद्यविकाराच्या झटक्याने अकाली निधन झालं होतं. आता त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे.

Eknath Shinde And Uddhav Thackeray (Photo Credit - Twitter)

3 नोव्हेंबरला पोटनिवडणूकी दरम्यान मुंबई मध्ये पहिल्यांदा निवडणूकीच्या रिंगणात शिंदे विरूद्ध उद्धव ठाकरे गट भिडणार आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त आहे. त्यावर आता शिंदे गटाकडून आणि शिवसेनेकडून आपले उमेदवार उभे करण्यात आले आहेत. शिवसेनेने या जागेवर त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. पण त्यांच्याविरूद्ध कोण रिंगणात उतरणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. ही जागा भाजपा लढणार की शिंदे गट  हे देखील अद्याप ठरलेले नाही. 6  नोव्हेंबरला निवडणूकीचा निकाल लागणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now