Mumbai: मुंबईमधील सर्व रेस्टॉरंट्स रात्री 12 तर इतर दुकाने रात्री 11 पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी- BMC
कोविडसाठी लागू असलेली मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन नागरिकांना आणि आस्थापनांना करावे लागणार आहे
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असून, आता रेस्टॉरंट रात्री 12 वाजेपर्यंत तर इतर दुकाने रात्री 11 पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आता महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या नियमांनुसार मुंबईमधील सर्व भोजनालये व उपहारगृह रात्री 12 तर इतर आस्थापने रात्री 11 पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कोविडसाठी लागू असलेली मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन नागरिकांना आणि आस्थापनांना करावे लागणार आहे. पूर्णपणे लसीकरण, गर्दीच्या क्षमतेवर निर्बंध, हे परिस्थिती नुसार लागू राहील. सध्या सणासुदीचे दिवस आहेत दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल इत्यादी सार्वजनिक ठिकाणी लोकांची जास्त गर्दी होण्याची शक्यता लक्षात ठेवून हा वेळ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)