Mumbai Airport वर 53 कोटींच्या हेरॉईनसह एकाला अटक, आरोपीला 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला शुक्रवारपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

Mumbai Airport वर 53 कोटींच्या हेरॉईनसह एकाला अटक, आरोपीला 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) एका प्रवाशाकडून तब्बल 53  कोटी रुपयांचे हेरॉईन (Heroin) जप्त करण्यात आले आहे. इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा (Addis Abba) येथून एक प्रवासी अमंली पदार्थाची तस्करी करत असल्याची माहिती डीआरआयला (Directorate of Revenue Intelligence) मिळाली होती. या माहितीवरुन अधिकाऱ्यांनी प्रवाशाला अडवले आणि त्याच्या सामानाची कसून झडती घेतली असता त्याच्या बॅगेत कोणालाही समजणार नाही अशा पद्धतीने ड्रग्ज लपवण्यात आले होते. नंतर चाचण्यांमध्ये हे हेरॉईन असल्याचे समजले. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला शुक्रवारपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

पहा ट्विट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 08, 2023 11:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).