Mumbai Airport: मुंबई विमानतळावर 6 प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स असलेले खासगी चार्टर्ड विमान धावपट्टीवरून घसरले, झाले क्रॅश (Watch Video)
विशाखापट्टणमहून आलेले VSR Ventures Learjet 45 विमान मुंबई विमानतळाच्या धावपट्टी 27 वर लँडिंग करताना घसरले.
मुंबई विमानतळावर गुरुवारी दुपारी एक खाजगी चार्टर्ड विमान घसरले आणि क्रॅश झाले. यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स होते. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. या अपघातामुळे इतर विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग थांबवण्यात आले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) सांगितले की, विशाखापट्टणमहून आलेले VSR Ventures Learjet 45 विमान मुंबई विमानतळाच्या धावपट्टी 27 वर लँडिंग करताना घसरले. यादरम्यान मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे दृश्यमानता केवळ 700 मीटर होती. त्यामुळेच हा अपघात झाला. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे डीजीसीएने म्हटले आहे.
(हेही वाचा: SpiceJet च्या विमानात को पायलट कडून मराठीत सूचना; सोशल मीडीयामध्ये व्हिडिओ वायरल)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement