Mumbai Air Pollution: दिवाळीत मुंबईकरांकडून उच्च न्यायालयाच्या फटाके फोडण्याबाबतच्या आदेशाचे उल्लंघन; पोलिसांनी दाखल केले 784 FIRs
नमूद केलेल्या निर्देशांचे गांभीर्य लक्षात घेऊन, मुंबई पोलिसांनी 10/11/2023 ते 12/11/2023 या कालावधीत मुंबईतील सर्व पोलीस स्टेशनमध्ये दैनंदिन कारवाया केल्या.
मुंबईमधील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. याचाच एक भाग म्हणून यंदाच्या दिवाळील फटाके फोडण्याच्या वेळेवर बंधन घालण्यात आले होते. आता सोमवारी एका प्रसिद्धीपत्रकात, मुंबई पोलिसांनी उघड केले की, त्यांनी फटाके फोडण्याच्या वेळेचे उल्लंघन केल्याबद्दल शहरातील 784 व्यक्तींविरूद्ध एफआयआर दाखल केले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दिवाळीमध्ये फक्त रात्री 8 ते रात्री 10 या कालावधीत फटाके फोडण्यास परवानगी दिली आहे. याआधी, शहरातील हवेच्या दर्जा बिघडल्याने मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून याची दखल घेतली होती आणि फटाके फोडण्यासाठी निर्दिष्ट कालावधीसह विविध मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.
वर नमूद केलेल्या निर्देशांचे गांभीर्य लक्षात घेऊन, मुंबई पोलिसांनी 10/11/2023 ते 12/11/2023 या कालावधीत मुंबईतील सर्व पोलीस स्टेशनमध्ये दैनंदिन कारवाया केल्या. या कालावधीत एकूण 784 प्रकरणे बृहन्मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आली असून, 806 जणांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यापैकी 734 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा: Mumbai Air Pollution: दिवाळीच्या एका दिवसानंतर मुंबईमधील प्रदूषणात प्रचंड वाढ; AQI 234 पर्यंत वाढला, 'खराब' हवेत श्वास घेणेही कठीण)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)