Mumbai: वायफाय हॉटस्पॉटचा पासवर्ड देण्यास नकार दिल्याने 17 वर्षीय मुलाची हत्या
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून चौकशीत त्यांनी वायफायचा पासवर्ड न सांगितल्याने तरुणाचा वार करून खून केल्याचे उघड झाले.
मुंबईतील कामोठे परिसरात वायफाय हॉटस्पॉटचा पासवर्ड देण्यास नकार दिल्याने एका 17 वर्षीय मुलाची दोघांनी हत्या केली. दोघेही दारूच्या नशेत होते. मुलाला पासवर्ड देण्याचा त्यांनी आग्रह केला, परंतु तरुणाने पासवर्ड न दिल्याने दोघांनी चाकूने भोसकून त्याची हत्या केली. या घटनेनंतर दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे, नवी मुंबई डीसीपी झोन-1 विवेक पानसरे यांनी सांगितले की, मयत आणि दोन्ही आरोपींमध्ये भांडण झाले, त्यानंतर दोन्ही आरोपींनी चाकूने वार करून मृताची हत्या केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून चौकशीत त्यांनी वायफायचा पासवर्ड न सांगितल्याने तरुणाचा वार करून खून केल्याचे उघड झाले. ही घटना 27 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कामोठे परिसरातील एका इमारतीत घडली. रवींद्र अटवाल आणि राज वाल्मिकी अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे असून दोघेही कामोठे परिसरातील मारुती भवन नावाच्या इमारतीत साफसफाईचे काम करतात.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)