Mulund Traffic: मुलुंड टोल नाक्याजवळ पुन्हा एकदा वाहतूक कोंडी; गाड्यांच्या लांबच लांब रांगा (Watch Video)

नागरिकही या वाहतुक कोंडीला त्रस्त झाले आहे.

Mumbai Thane traffic PC Twitter

Mulund Traffic: ठाणे (Thane) ते मुंबईच्या (Mumbai) दिशेने जाणाऱ्या मुलुंड टोल नाका (Toll Naka) या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे.गाड्यांच्या लांबच लांब रांगा दिसत आहे. या मार्गावरील प्रवाशी त्रस्त झालेले आहे.  दोन ते तीन किलोमीटर वाहतूक कोंडीचा फटका कामावर जाणाऱ्या चाकरमाण्यांना बसत आहे. यामध्ये रुग्णवाहिका असतील ,दुचाकी ,चारचाकी वाहनांना देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. टोलनाक्याची वसुली असेल आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे वाहतुकींची कोंडी झालेली आहे. कामावर जाण्याऱ्या चाकरमान्यांना वाहतुकीच्या या समस्येला नेहमी तोडं द्यावे लागत आहे.

अर्धवट कामामुळे आणि रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आठवड्यातील चौथा दिवस असून चाकरमान्याना कामावरती जाण्यासाठी देखील उशीर होत आहे. त्यामुळे वाहतूक विभाग याकडे कशाप्रकारे लक्ष देऊन वाहतूक कोंडी सोडवणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे .मुंबई आणि बाहेरील नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif