MPSC Exam Revised Dates: राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 आता 23 जानेवारी दिवशी; पहा नवं वेळापत्रक

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 सह काही परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. आता त्याच्या नव्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

MPSC logo (Photo Credits: Website)

MPSC परीक्षेच्या नव्या तारखा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. 2 जानेवारीला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 आता 23 जानेवारी 2022 दिवशी होणार आहे. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा  मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर  क्रमांक 1 आता 29  जानेवारी 2022 आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा  2020 पेपर क्रमांक 2  पोलिस उपनिरीक्षक आता 30 जानेवारी 2022 ला होणार आहे.

Maharashtra Public Service Commission ट्वीट 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now