Patra Chawl Land Scam Case: पत्रा चाळ प्रकरणात खासदार संजय राऊत मुंबई सत्र न्यायालयात दाखल
दरम्यान, राऊत यांना जामीन देताना न्यायालयाने ईडीवर जोरदार ताशेरे ओढले होते. या प्रकरणातील बाकीच्या आरोपींना अटक न करता आगोदर आरोपी निवडले आणि मग अटक केली का? असा सवालच न्यायालयाने ईडीला केला होता.
पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत मुंबई सत्र न्यायालयात दाखल झाले आहेत. याच प्रकरणात असलेल्या कथीत संबंधांप्रकरणी अंमलबजावणी संचालयाने संजय राऊत यांना अटक केली होती. मात्र, ईडीच्या या कारवाईला संजय राऊत यांनी न्यायालयात आव्हान दिले. संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. संजय राऊत सध्या जामीनावर बाहेर आहेत. दरम्यान, राऊत यांना जामीन देताना न्यायालयाने ईडीवर जोरदार ताशेरे ओढले होते. या प्रकरणातील बाकीच्या आरोपींना अटक न करता आगोदर आरोपी निवडले आणि मग अटक केली का? असा सवालच न्यायालयाने ईडीला केला होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)