Monsoon Update: महाराष्ट्रात कधी येणार मान्सून? उकाड्यामुळे नागरिक हैराण; काय आहे हवामान तज्ज्ञांचा अंदाज; घ्या जाणून
दरम्यान पुढचे चार पाच दिवस काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाटही पाहायाल मिळू शकते, असेही होसाळीकर यांनी म्हटले आहे.
उन्हाळा शेवटच्या टप्प्यात असला तरी मान्सून लांबणीवर पडल्याने नागरिकांची अद्यापही उन्हाने काहिली होत आहे. उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढला असून, पाऊस केव्हा एकदा बरसतो असी नागरिकांची स्थिती झाली आहे. त्यामुळे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार नागरिक आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. हवामान विभागाचे अधिकारी के एस होसाळीकर यांनी ट्विटर हॅंडलवर दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातपुढील 2, 3 दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. दरम्यान पुढचे चार पाच दिवस काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाटही पाहायाल मिळू शकते, असेही होसाळीकर यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Monsoon Update: वरुणराजाचा सांगावा! केरळमध्ये आज मान्सून दाखल होण्याची शक्यता; महाराष्ट्रासाठी मुहूर्त कधी? IMD ने काय म्हटलं?)
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)