Mumbai Weather Forecast Today: मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अलर्ट

मुंबईत आणि उपनगरात आज २९ जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसाने काही ठिकाणी पाणी साचले आहे.

Rain

Mumbai Weather Forecast Today: भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट जाहिर केला आहे. मुंबईत आणि उपनगरात आज 29 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसाने काही ठिकाणी पाणी साचले आहे. काल मुंबईत काही ठिकाणी रिमझिम पाऊस होता. ठिकठिकाणी मुसळधार पावसाने ब्रेक घेतला होता. शहरात मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याची शक्यता आहे. आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ( हेही वाचा-शेतकरी ओढा ओलांडत असताना अचानक बैलगाडीसह पाण्यात वाहून गेला, यवतमाळ जिल्ह्यातील घटना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)