Viral Video: मॉक ड्रील सुरु असताना, दहशवाद्याची भुमिका करणाऱ्याला नागरिकांनी दिला चोप (Watch Video)

धुळे पोलीसांत मॉक ड्रिल सुरु असताना, एक विचित्र प्रकार घडला आहे. त्याचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Dhule mock Drill Viral Video PC twitter

Viral Video:  महाराष्ट्रातील धुळे येथील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. धुळे पोलीसांच मॉक ड्रिल चालू असताना दशहवाद्याच्या भुमिकेत बसलेल्या व्यक्तीला नागरिकांनी चांगला चोप दिला आहे. धुळ्यातील स्वामीनारायण मंदीरात दहशतवादी घुसल्याचे जवळील रहिवाशांना समजले. परिसरात दहशवादाची घटना समजताच सर्वींकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले.  पोलीसही घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर हा प्रकार समजून आला. परिसरात भीतीचे वातावरण पसरवल्यामुळे भडकलेल्या नागरिकांनी दहशतवाद बनलेल्या व्यक्तीला चोप दिला. त्यानंतर ही घटना पोलीसांच्या लक्षात आली आणि पोलीसांनी चोप देणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement