Mobile Catches Fire in Mumbai Train: मुंबई मोनोरेलमध्ये गेम खेळत असताना प्रवाशाच्या मोबाईलला अचानक लागली आग; मोठी दुर्घटना टळली

जीटीबी स्टेशनवर सकाळी 9.35 वाजता ही घटना घडली.

Mumbai Monorail | Image Used for Representational Image Only | (Photo Credits: PTI)

Mobile Catches Fire in Mumbai Train: मुंबईमध्ये बुधवारी सकाळी मोनोरेलमध्ये एक मोठी दुर्घटना टळली. मोनोरेलमधून प्रवास करताना एका प्रवाशाच्या मोबाईल फोनला अचानक आग लागली. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) च्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी गेम खेळत असताना त्याच्या फोनला आग लागली. जीटीबी स्टेशनवर सकाळी 9.35 वाजता ही घटना घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. त्यानंतर कर्मचारी आणि सुरक्षा पथककाने प्रवाशांना त्यांचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी सुरक्षितपणे बाहेर काढले. नंतर प्रभावित ट्रेनची आणि ट्रेनच्या सुरक्षेची तपासणी केली गेली.

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने लोकांना ट्रेनमध्ये मोबाईल फोन वापरताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. ‘फोनचा सतत वापर केल्याने, बॅटरी गरम होते परिणामी अशा दुर्घटना घडतात. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी लोकांनी आपला फोन वापरताना काळजी घ्यावी.’ (हेही वाचा: Central Railway Mumbai Local Update: मुंबई मध्य रेल्वे सेवा विस्कळीत, गाडीला चुकीचा सिग्नल, कर्जत, बदलापूर दोन्ही मार्ग बंद; प्रवासी फलाटावर खोळंबले)

पहा पोस्ट-

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)